नवापूर येथे साध्या पध्दतीने आदर्श ‘शुभमंगल’

3

नवापूर: शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नातील सर्व पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन शासकीय आदेशांचे काटेकोर पालन करुन सोशल डिस्टन पाळत घोडे व भामरे परिवाराने साध्या पध्दतीने आदर्श विवाह पार पाडला. हा विवाह सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.कोणत्याही प्रकारचा आहेर, भेट स्विकारण्यात आले नाही. यावेळी सँनिटायझरची सोय करण्यात आली होती.

नवापूर शहरातील देवळफळी भागातील रहिवाशी तथा सार्वजनिक मराठी हायस्कुलचे माध्यमिक शिक्षक प्रकाश आत्माराम घोडे यांचा मुलगा अभिजित आणि सेलवास येथील अरविंद दयाराम भामरे यांची मुलगी प्रियंका यांचा विवाह बौध्द पध्दतीने पार पाडला. लाँकडाऊन सुरू असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन दोन्ही परिवाराने करुन विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्याला नातलगसह २० ते २५ जण उपस्थित होते. प्रत्येक जण अंतर ठेवुन उभे राहून सर्वानीच मास्क लावले होते.

Copy