नवापूर येथे महिला कर्मचार्‍यांचा सत्कार

0

नवापूर । उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक महिला दिना निमित्त महिला कर्मचार्‍यांचा सत्कार वैद्दकीय अधिक्षक डॉ.अविनाश मावची यांच्या हस्ते भेट वस्तु व गुलाब पुष्पदेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.कितीलता वसावे, डॉ.मनिषा वळवी, डॉ.युवराज पराडके यांनी महिला सफाई कामगार व सर्व अधिपरीचारीका यांना भेट वस्तु सत्कार केला.

यावेळी डॉ.अविनाश मावची यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन कैलास माळी यांनी तर आभार सुवार्ता गावीत यांनी मानले. बी. बी. पाटील, बजरंग भंडारी, चंद्रकात पावरा, विवेक भामरे, प्रविण वाघ, गणेश चौधरी, संजय हिवरखेडे, सोमा कोकणी यांनी कामकाज पाहिले.