नवापूर येथे दहावी परीक्षा केंद्राची बैठक व्यवस्था जाहीर

0

नवापूर । एसएससी (इयत्ता दहावी) शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2017 केंद्र क्रमांक 2231(क) श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बैठक क्रमांक डी 134311 ते 134959 असलेल्या विद्यार्थाची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

2231 (क) या केंद्रात श्री शिवाजी हायस्कूल नवापूर, वनिता विद्यालय नवापूर, शासकीय अनुदानित आश्रमशाळा कोळदा, शासकीय आश्रमशाळा बंधारे, शासकीय आश्रमशाळा धनराट, आदर्श माध्यमिक विद्यालय रायपुर, न्यु इंग्लिश स्कूल उमराण, माध्यमिक विद्यालय भवरे या शाळा समाविष्ट आहेत श्री शिवाजी हायस्कूल केंद्र क्रमांक 2231 (क) या केंद्रात डी 134311 ते 13495 सीट नंबर असलेल्या विद्यार्थाचा परिक्षेची बैठक व्यवस्था आहे एकूण 652 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. मुख्य व समोरील इमारत मिळुन एकुण 22 वर्ग खोल्यांमधे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. 7 मार्च ते 30 मार्च पर्यंत या कालावधीत परिक्षा होणार आहेत पर्यवेक्षकांची बैठक आयोजित करून सर्वाना परिक्षा संदर्भात सविस्तर माहिती व सुचना देण्यात आल्या आहेत परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती केंद्र क्रमांक 2231 (क) चा संचालिका दक्षा कदम यांनी दिली आहे.