नवापूर येथे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात

0

नवापूर । नवापूर शहरातील प्र.अ.सोढा, सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्व. हरीषबाबु उर्फ जापान यांच्या स्मरणार्थ जापान ट्रॉफी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धाचे पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे शिरीष शाहा होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन.युनियन बॅकेचे शाखा व्यवस्थापक ओमप्रकाश मिना, नगरसेवक चंद्रकात नगराळे, जापान ट्रॉफी स्पोर्ट कमिटीचे अध्यक्ष संजीव पाटील, मुख्याध्यापक मिलिंद वाघ, महेश पाटील, निलेश प्रजापत, उपमुख्याध्यापक एस.एम.महाले, पर्यवेक्षक जी.एस.सारखे उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते हरीष बाबुच्या प्रतिमेचे पुजन करण्यात करण्यात आले. यशस्वी विदयार्थी व संघनायक यांचा मॅडल. रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जापान ट्रॉफीच्या यशस्वी आयोजना बद्दल एन.आर.गावीत, सोनु गावीत, गणेश महाजन, एस.एस.खैरनार यांचा ही प्रशस्तीपत्रक देवुन गौरव करण्यात आला. ओमप्रकाश मिना यांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्यांनी स्वयं विजेता मानुन आत्मविश्वास वाढविल्यास ते राष्ट्रीय स्तरापर्यत जावू शकतात असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतातुन शिरीष शाह यांनी आपले आयुष्य उज्वल करण्यासाठी वेळ हा महत्वाचा असुन शाळेतील प्रत्येक वेळ ही सत्कार्नी लावल्यास तुमचे जीवन सफल होईल असे सांगितले. तसेच कार्यक्रमात बॅडमिंटल स्पर्धातील यशस्वी विदयार्थ्याचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी केले. सुत्रसंचलन अनिल वळवी यांनी केले तर आभार क्रिडाशिक्षक एम.टी.पाटील यांनी मानले.