नवापूर येथील भाविकांच्या पदयात्रेदरम्यान गणवेश वाटप

0

नवापूर । नवापूर येथील आठवडे बाजार पदयात्रा संघटनेतर्फे श्री सप्तशृंगी माता पदयात्रा दरम्यान नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ला परिसरातील वनवासी शेकडो बालकांना गणवेश वाटप करण्यात आले. नवापूर शहरातून हजारो भाविक भक्त राम नवमीच्या पूर्व संध्येला सप्तशृंगी देवीच्या गडाकडे पदयात्रेने रवाना झाले होते. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ला परिसरातील वनवासी शेकडो बालकांना आठवडे बाजार पदयात्रा संघटनेचे बाळू टिभे, राजू सिंधी पदयात्रा सेवा समितीचे हेमंत जाधव,प्रशांत पाटील, शैलेश सैन, रज्जू अग्रवाल यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.

नगरसेवक-नगरसेविका यांनी उपक्रमांचे केले कौतुक
गेल्या पंधरा वर्षापासून परंपरागत बफखेल येथे विश्रांतीसाठी असलेल्या भाविकांना माजी जि. प. अध्यक्ष भरत गावित यांच्यातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात येत असते .यावेळी बफकेल येथे राम नवमीनिमित्त जि. प. सदस्या संगीता गावित यांची हस्ते भगवान श्रीराम यांचे प्रतिमा पूजन, महाआरती करून स्वादिष्ट भोजन देण्यात आले. आले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष भरत गावीत, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, माजी नगराध्यक्ष दामू बिर्‍हाडे ,नगरसेवक नरेंद्र नगराळे, नगरसेविका मेघा जाधव, नगरसेवक अजय पाटील. माजी नगरसेवक विनय गावित,हरिष पाटील,दर्शन पाटील सुधीर निकम,किरण टिभे, कार्तिकभाई थेवर आनंत पाटील, विजय सैन,विजू ताऊ,जयंत जाधव, आदींनी भेट देवून पदयात्री भाविकांना शुभेच्छा दिल्यात. मातेच्या दर्शनासाठी पदयात्रेने जातांना गोर गरीब शेकडो बालकांना गणवेश वाटपाचा स्तुत्य उपक्रम केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.