नवापूरात बसच्या धडकेने दुचाकीवरील विवाहिता जागीच ठार : पती जखमी

खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात घडला अपघात ः बस चालकाला अटक

नवापूर : शहरातील डी.जे अग्रवाल इंग्लिश मीडियमजवळ महामार्गावरील खड्डे चुकवण्याचा नादात बसने स्कूटरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शहरातील विवाहितेचा मृत्यू झाला तर विवाहितेचे पती जखमी झाले. मंगळवारी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. कल्पनाबाई शरद पाटील (33, भडणे, ता.शिंदखेडा) असे मयत विवाहितेचे तर शरद पाटील असे जखमीचे नाव आहे.

चाकात आल्याने महिलेचा मृत्यू
नवापूरातील पाटील दाम्पत्य धार्मिक कार्यक्रमासाठी नातेवाईकांच्या घरी दुचाकी (क्रमांक जी.जे.19 ए.आर. 8644) ने दाम्पत्य आपल्या गावी जात असताना पाठीमागून आलेल्या साक्री आगाराच्या वापी-धुळे बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल. 3425) वरील चालकाने खड्डा चुकवण्याचा नादात स्कूटरला जोरदार धडक दिल्याने स्कूटरवर मागच्या बाजूला बसलेली विवाहिता बसचा मागच्या टायर मध्ये आल्याने जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाले. घटनास्थळी तत्काळ नवापूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्यासह पथकाने धाव घेत जखमीला उपचारार्थ हलवले. दरम्यान अपघातग्रस्त बससह स्कूटर व बस चालकास नवापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.