नवापूर पोल्ट्रीतील कोंबड्यांचे कलिंग करण्याचे काम सुरुच

0

आमदार शिरिषकुमार नाईक यांनी केली बर्ड फ्लु भागाची पहाणी

विधानसभेत नुकसानभरपाई संदर्भात प्रश्न उपस्थित करणार: आ.शिरिषकुमार नाईक

नवापूर: आज गुरुवारी 11 रोजी पाचव्या दिवशीही पोल्ट्रीमधील कोंबड्यांचे कलिंग करण्याचे काम सुरू होते. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार आजमुस्तफा-२-७६०९,सफा-६०७७,न्यु.शांती-९९२७,जस-५३९८,शाहीन-१६२१९,एफ सन्स-६०११ असे एकुण ५१२४१ पोल्ट्रीतील कोंबड्यांचे पथकामार्फत कलिंग करण्यात आले. १६ पोल्ट्रीतील कोंबड्यांचे अहवाल पोझिटिव्ह असल्याने १६ ही पोल्ट्रीतील कोंबड्यांचे कलिंग पुर्ण करण्यात आले असुन आता पर्यत ३ लाख ७९ हजार ४५६ कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले आहे असे नियोजन प्रशासनाचे असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली अंडी मोजणी करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक, पशुसंवर्धन कर्मचारी यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या चार दिवसांपासुन पुणे येथील पशुसवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड, प्रांत अधिकारी वसुमना पंत,तहसिलदार मंदार कुलकर्णी,पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.एस.एस.राऊतमाने,उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रवंदळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी.पाटील, उपशिक्षण अधिकारी डॉ.युनूस पठाण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलिस निरीक्षक नासिर पठाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशीकांत वसावे आदी सर्व अधिकारी परीस्थीवर नजर ठेऊन आहेत. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या परिस्थितीची पाहणीकरीत माहिती जाणून घेत आहेत.पोल्ट्री परिसरात बंदोबस्तासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.कोरोनाच्या महामारीत बर्ड फ्लू आल्याने आता पुन्हा नवे संकट उभे राहिले आहे. पोल्ट्री व्यवसायीकांचे कोट्यावाढी रुपयांचे नुकसान होणार आहे. पोल्ट्री व्यासायीकांवर मोठी आपत्ती येणार असून अनेक लोक बेरोजगार होणार असून त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.

तलाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत 27 पोल्ट्री मधील पशुखाद्याची मोजमाप व पंचनामा करून पशुखाद्य गोडाउन मध्ये सील करण्याची काम करण्यात आले आहे नवापूर शहरातील मोठ्या पोल्ट्रीमध्ये पशुखाद्याची निर्मिती केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पशुखाद्य पोल्ट्री फार्म मध्ये दिसून येत आहे त्यात मका सोयाबीन ढेप,शिंगढेप ज्वारी या पासून पोल्ट्री व्यावसायिकांनी आधुनिक मशीनच्या सहाय्याने पशुखाद्य तयार केले जाते व व्यवसायिकांनी पशुखाद्य नष्ट न करता त्याला 90 दिवसापर्यंत सील करून ठेवावे त्यामुळे शासनाच्या व्यावसायिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार नाही अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. प्रशासनाने तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्म ची कोंबडी खाद्याची गोडाऊन सील केले.

दरम्यान नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी बर्ड फ्यु असणाऱ्या पोल्ट्री फार्म भागाची पाहणी करून नुकसान झालेल्या व्यवसायिकांची समस्या जाणून घेतली त्यांच्याशी चर्चा केली. नवापूर शहरातील पोल्ट्री व्यवसाय यांचे मोठे नुकसान झाले आहे यासंदर्भात विधानसभेत नुकसान भरपाई संदर्भात प्रश्न उपस्थित केला जाईल पशुसंवर्धन मंत्र्यांशी चर्चा करून तात्काळ मदत निधी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सांगितले.

Copy