नवापूर तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात रोजगाराची संधी उपलब्ध

0

नवापूर:आदिवासी बहुल तालुका संपुर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नवापूर तालुक्यातील आदिवासी लोकवस्ती असताना सोशल डिस्टनसिंग तसेच शासनाचे नियमांचे पालन करत लॉकडाऊनच्या ५३ दिवसापर्यन्त नवापुरकरांनी कोरोनाला मात दिली असल्याने आजतागायत संपुर्ण नवापूर तालुका कोरोना मुक्त आहे.प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनाचे पालन करत पालकमंत्री के.सी. पाडवी आणि तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊनच्या काळात रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनात गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी आपल्या कुशल नेतृत्वात तालुक्याचा ग्रामीण जनतेला शिस्तप्रिय बनवत कामांना गती देण्याचे काम केले आहे. चिंचपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत चिंचपाडा येथील बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी पं.स सदस्य ललिता वसावे,सरपंच नम्रता वळवी, ग्रा.पं.सदस्य राजु वसावे,धिरसिंग गावित, विकास वळवी, किरण नाईक,ग्रामविकास अधिकारी संजय खैरणार, सपना कुंवर, प्रा.दिपक जयस्वाल,अशोक गावित, वंसत वाघ,विस्तार अधिकारी किरण गावीत आदी उपस्थित होते.
चिंचपाडा येथील बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी ८ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले आहे. या कामामुळे २५२ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला असून आमदार नाईक यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. ब्रिटीश कालीन पाणी साठवण बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रस्ताव चिंचपाडा ग्रामपंचायतीने सादर केला होता. त्यात पंचायत समिती स्तरावर प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने या कामाला सुरुवात करण्यात आली. या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग परिसरातील शेती व पिण्यासाठी होतो.त्यामुळे या बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या मंजुरी मिळून कामास सुरुवात करण्यात आली.