नवापूर तालुक्यातील सर्व स्वँब रिपोर्ट निगेटिव्ह

1

नवापूर: तालुक्यातील विसरवाडी परिसरातील ४८ वर्षीय पुरुषाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली होती. त्याच परिसरात इसमजवळ ८ लोकांच्या अधिक संपर्कात आला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. विसरवाडी परिसर संपूर्ण बाजारपेठसह अत्यावश्यक सेवाही ५ दिवस बंद करण्यात आली होती.सुदैवाने आज पॉझिटिव्ह रुग्णांचा संपर्कातील ६ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे.तसेच नवापूर शहरातील एका ग्रामसेविकेचा रिपोर्ट ही निगेटिव्ह आला आहे. या सुखद बातमीमुळे प्रशासनासोबत नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

नवापूर तालुक्यात प्रथमच प्रथम रुग्ण आढळून आल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती. तहसीलदार सुनिता जऱ्हाड, बीडीओ नंदकुमार वाळेकर, वैद्यकीय अधिकारी हरिश्चंद्र कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यासह आरोग्य विभागाचे पथक यांनी विसरवाडी येथे जाऊन रात्रभर संपर्कातील लोकांचा शोध घेऊन परिसर सील केला होता. त्यादिवशी अधिकाऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मार्फत नागरिकांचे स्केनिंग करण्यासह आजाराच्या रुग्णावर लक्ष ठेवून आहेत. बाहेरगावाहून प्रवास करणाऱ्या त्या-त्या गावातील ग्रामस्थांना सूचना करून तपासण्या करून घेण्यात येत आहे. दरम्यान, विसरवाडी गावातील विविध भागात औषध फवारणी करून सेनेटाईझरचा वापर करण्यात आला. सरपंच बकाराम गावित, ग्रामसेवक कैलास सोनवणे यांनी वेळोवेळी गावात भेटी देऊन माहिती घेत याबाबत नागरिकांना दक्षता घेण्याचे सांगण्यात आले.गडदाणीच्या मुंबई रिटर्न पोलीसांच्या सहा नातलगांचा स्वँब रिपोर्ट प्रतिक्षेच होता. तो निगेटिव्ह आल्याने सर्वानी सुटकेचा निस्वास सोडला अाहे.

Copy