नवापूर : जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवापूर : नवापूर शहरात कोविड-19 चे रुग्ण दिवसेन दिवस वाढत असल्याने संपुर्ण नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी नंदुरबार जिल्हात शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू लागु केली आहे. शनिवारी नवापूरकरांनी शंभर टक्के जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. नवापूर शहरात सकाळपासून तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, मुख्याधिकारी महेश चौधरी शहरात फेरफटका मारून जनता कर्फ्यूचा आढावा घेतला.

शहरात पालिकेकडून बॅरीकेटींग
शहराच्या मुख्य रस्त्यावर नवापूर नगरपालिकेने बॅरकेटींग केली असून चौका-चौकात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शहरात चार चाकी, टु व्हिलर गाड्यांच्या चालकांची विचारपुस करुन शहरात एंट्री दिली जात होती. नवापूर शहरातील जनता पार्क, गुजरगल्ली, सरदार चौक भागात नागरीकांची कोविड टेस्ट करण्यात आली. जनता पार्क, गुजरगल्ली भागात नगरसेविका अरुणा पाटील तसेच नगरसेविका बबीता वसावे यांनी त्यांचा प्रभाग 2 मध्ये फिरुन नागरीकांना कोविड-19 टेस्ट करण्याची विनंती केली. त्याला नागरीक प्रतिसाद देत आहे. यावेळी तहलीलदार मंदार कुलकर्णी, नवापूर नगरपालिकेचे मुख्यधिकारी महेश चौधरी,आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुंभाष कुंभार आदी उपस्थित होते.

Copy