नवापूरात स्वच्छ भारत अभियान

0

नवापूर : नवापूर येथे स्वच्छ भारत अभियाननिमित्त आज सकाळी 8 वाजेपासून तहसिल कार्यालय आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर झाडू मारून स्वच्छ करण्यात आले. श्री शिवाजी हायस्कूल येथे स्वच्छते बद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व प्रथम संत गाडगेबाबा यांचा प्रतिमेला जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ काल्लशेटी यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. जिल्हाधिकारी यांचा सत्कार तहसिलदार प्रमोद वसावे यांनी केला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नवापूर शहरात अजुन ही शौचालयाबद्दल मी समाधानी नाही. आपले शहर आहे याला स्वच्छ ठेवण्याचे काम आपले आहे. नवापूर तालुका हा हगदारी मुक्त करायच आहे हे निश्चित करून घ्या, आत नोटावर ही स्वच्छ भारत मिशनची जाहीरात येत आहे. यावरून स्वच्छता किती महत्वाची आहे हे लक्षात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

स्वच्छतेसाठी नागरिकांच्या सहभागाची गरज
लोकांनी स्वता राहुन मोहीमेत सहभागी व्हावे सफाई कामगारांना पण लोकांनी मदत केली पाहीजे, अशी सहकार्‍याची अपेक्षा मी करतो, स्वच्छ नवापूर शहराची संकल्पना तयार करा, शहर हगणदारी मुक्त स्वच्छ शहर झाले तरच तालुक्यातील गाव पाडे स्वच्छ होतील कागदांवर स्वच्छता नको आहे. मला खर्‍या अर्थाने शहर व तालुका हागणदारी मुक्त पाहायचा आहे. यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांना लोकांची साथ पाहीजे स्वच्छते बाबत गंभीर झालो तरच स्वच्छ भारत प्रत्येक्ष पाहायचा मिळल यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व गटशिक्षण अधिकारी रमेश देसले यांनी विद्यार्थाना आरोग्य विषयी माहिती देऊन हात धुवाचे प्रात्यक्षीक करून दाखवले व स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले तसेच यावेळी मुख्याधिकारी सौ प्रतिभा पाटील यांनी नवापूर शहरातील शौचालय व स्वच्छते बद्दल माहिती दिली तसेच पंचायत समिती कार्यालयाचे आर बी गावीत यांनी नवापूर तालुक्यातील स्वच्छते बद्दल माहिती आदिवासी भाषेतुन दिली यानंतर जिल्हाधिकारी यांनी बसस्थानक परीसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची पहाणी पायी चालत केली अधिकारी नगरसेवक यांना सुचना केल्या बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळया पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे सुञसंचलन अशोक रजाळे यांनी केले तर आभार हेमंत पाटील यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष रेणुका गावीत, गिरीष गावीत, नरेंद्र नगराळे, अजय पाटील, मेघा जाधव, सईदा शेख,रजीला गावीत, अनिता मावची, जिल्हा प्रशासन अधिकारी शांताराम गोसावी, तहसिलदार प्रमोद वसावे, पर्यवेक्षाधीन तहसिलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षण अधिकारी रमेश देसले, मुख्यधिकारी प्रतिभा पाटील, महेद्र चव्हाण, प्राचार्य आर.व्ही. पाटील, अनिल पाटील, भरत पाटील, प्रविण पाटील, मिलिंद निकम, मिलिंद भामरे,भरत पाटील, जयनु गावीत, मंगेश येवले आदी उपस्थित होते.