नवापूरात वाईन शाॅपवर तळीरामांची दारू खरेदीसाठी गर्दी

0

नवापूर:नंदुरबार जिल्ह्यात मद्यविक्रीला सुरुवात झाली असून वाईन शॉपच्याबाहेर मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून मोठ्या प्रमाणात दारू खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाहण्यास मिळाले.
नवापूर शहरातील वाईन शाॅपवर पुरुषानी मोठ्या प्रमाणात दारू खरेदी करताना दिसून आले. नवापूर शहरातील काही वाईन शाॅपवर सोशल डिस्टन्सचे पालन केले जात आहे तर काही वाईन शाॅपवर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडल्याचे चित्र दिसून आले. याबाबत पोलीस अधिकारी पोलिस वाहनात बसून सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे सांगून पेट्रोलिंग करीत आहे. तर काही पोलीस कर्मचारी रस्त्यावर चोख बंदोबस्त करताना दिसत आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मंगळवारपासून मद्य विक्रीला सुरुवात झाली असून दारूच्या दुकानांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. दारू खरेदीसाठी सुरक्षित अंतर ठेवून दारू विक्री केली जात आहे. तर काही ठिकाणी मोठी गर्दी निर्माण झाली आहे. गुजरात राज्यातील सुरत पासून सोनगडपर्यंतचे मद्य शौकिन खासगी वाहने घेऊन नवापूर शहरात दारू खरेदीसाठी सकाळपासून गर्दी केली आहे. सध्या लाॅकडाऊन दरम्यान दारूचे भाव वधारलेले दिसून आले. दारू खरेदी करण्यासाठी 8 ते 12 वाजेची वेळ निश्चित करण्यात आली आहे.त्यामुळे सकाळपासून महाराष्ट्र गुजरात राज्यातील लोकांची गर्दी दिसून आहे.

Copy