नवापूरला औद्योगिक क्षेत्रात चोरीचे सत्र सुरूच

1

नवापूर:शहर व कोठाडा शिवारात असलेल्या एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल कंपनीत मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एमआयडीसीतील साधारणत पंधरा कंपन्यांमध्ये चोरी झाल्याचे समोर आले आहे.यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यामध्ये एमआयडीसीचे मालक यांनी नवापूर पोलीस ठाण्यात एका चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची धरपकड करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. उद्योजक चोरीने हैराण झाले आहेत. दरम्यान, पोलीस गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

नवापूर शहरातील एमआयडीसीमधील सिमेंटच्या पोती, लोखंडी पत्रे, बोरवेल मोटर, बॅटरी, लुम्सची मोटर, ऑइल, ईश्वर पाटील यांच्या वाहनातील 9 बॅटरी असे अनेक साहित्य चोरीला गेलेला आहे. साधारण 8-10 लाखांची चोरी झाली आहे.

गुजरात राज्यातील दीडशेच्या आसपास टेक्सटाइल कंपनी नवापूरला विशेष सवलत मिळत असल्याने सुरू करण्यात आलेला आहे.

चोरीच्या सत्रामुळे उद्योगपती हैराण

चोरीच्या सत्रामुळे ईश्वर पाटील, नरेंद्र अग्रवाल,प्रदीप पोद्दार, राजू वाघणी, रमेश जासोलिया, सुनील पटेल, जसुभाई मानगोटीया, वसल सोमानी, धनजी गोटी, राजू पटेल यांच्या कंपनीत चोरी झाली आहे. यामुळे उद्योगपतीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नवापूर पोलिसांनी व्यापाऱ्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. नवापूर शहरातील एमआयडीसी परिसरामध्ये पोलीस पेट्रोलिंग व्यवस्थित होत नसल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Copy