नवापूरमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

0

नवापूर : नवापूर तहसील कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापुजन करण्यात आले. यावेळी महिला कर्मचारी रंजनाबाई ओगले, रेशमाबाई गांगुर्डे, वर्षा माळस्कर यांचा हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रमोद वसावे, नायब तहसिलदार अमर यादव, बी. एस. पावरा, पुरवठा निरीक्षक मिंलद निकम यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार प्रमोद वसावे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सावित्रीबाई फुले यांचे कार्य फार महान होते. मुलीसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालु करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होते. या ज्ञान गंगेतुन त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरू केले. मुलींच्या शाळेच्या त्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या असे त्यांनी यावेळी सांगितले.

सावित्रीमाईला अभिवादन
नवापूर शहरातील देवळफळी भागातील पुष्पवन महिला बहुउद्देशिय संस्था येथे भारतीय सावित्रीमाई फुले यांचा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कु.किचन लोणारीच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष पुनम बिराडे, सोनल बिराडे, राणु मावची, संगिता पाटील, शोभा सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात आंतरजातीय विवाह केलेल्या सुनिल सोनवणे व शकुंतला सोनवणे या दांपत्याचा सत्कार करण्यात आला. बिराडे यांनी सावित्रीमाई यांच्या जीवनचरित्राविषयी मार्गदर्शन केले. तसेच या संस्थेतर्फे 8 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ-सावित्रीमाई व आजची स्त्री या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.