नवापूरमध्ये वन विभागाने केले 80 हजाराचे लाकूड जप्त

0

नवापूर । नवापूर शहरात भारत फर्नीचर मार्ट येथे राञी 10 वा. नवापूर वनविभागाने 80 हजार रूपए किमतीचे सागाचे लाकूड जप्त केले. वनविभागीय अधिकारी दक्षता धुळे व उपवनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा वनक्षेत्रपाल नवापूर यांनी गुप्त बातमीवरुन ॠ.ग 1.इ.त.3012या क्रमांकाची ट्रक मध्ये साग भरलेले ताज्या तोडीचे लाकुड 144 नग जप्त केले. ज्याची किंमत 80 हजार 640 रुपए सांगितली जात आहे. यासोबत ट्रक असे एकुण 5 लाख 30 हजार 640 रुपयांचा माल पकडुन जप्त करण्यात आला आहे.

आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी भारत फर्नीचर मार्टचे मालक असद आबास कुरेशी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही नवापुपूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल ए.एन. जाधव, एस.एल कासार, प्रकाश मावची, के.व्ही वळवी, सतिष पदमोर, वाहन चालक भगवान साळवे यांनी केली. हडपे यांनी यापुर्वी अनेक वेळा वनसंपदा असलेले लाकूड पकडून कारवाई केली आहे. तसेच गस्त घालुन वन तस्करांवर धाक निर्माण केला आहे.