नवापूरच्या राकेश प्रजापतसह परिवाराने पोलिसांना शेकडो मास्क तयार करुन दिले

0

समाजात निर्माण केला आदर्श

नवापूर। जगात व देशात कोरोनाचे संकटात आला असुन सर्वत्र लाँकडाऊन झाले आहे. अशा परिस्थितीत कोरोना महा विषाणूचा मुकाबला करण्यासाठी जो तो प्रयत्न करीत आहे. प्रशासन व अनेक दाते गोरगरीब लोकांची उपासमार टाळावे म्हणून त्यांना संसारोपयोगी साहित्य वाटप करीत आहे. मात्र जे पोलीस २४ तास आपल्या जिवाची पर्वा न करता लॉकडाऊनच्या काळात काम करीत आहे. अशा पोलीस बांधवांसाठी नवापूर शहरातील सामान्य परिस्थिती असुनही राकेश प्रजापत व त्याच्या परिवाराने घरी शेकडो मास्क तयार करुन ते नवापूर पोलीस ठाण्यात येऊन ठाणे अंमलदार युवराजसिंग परदेशी यांच्याकडे दिले. एका सामान्य टेलर परिवाराने माणुसकीच्या भावनेने आपल्यासाठी २४ तास राबणाऱ्या पोलीस बांधवाना काही होऊ नये म्हणुन मास्क देऊन सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय आणुन समाजापुढे एक आदर्श निर्माण करुन दिला आहे.