नवापुर येथे महात्मा गांधी वाचलायात ऋण स्वीकार समारंभ उत्साहात

0

नवापुर । शहरातील महात्मा गांधी वाचलायात ऋण स्वीकार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम नवापुर शहरातील मुळ निवासी अलायन्स कलब आफ सुरत सुर्यकिरनचे जयंत शहा, धनसुख शहा, भुपेंद्र चहावाला, अशोक मेवावाला, रागीनी शहा, हनसा शहा यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात नवापुर नगरपालिकेचे सफाई कामगार यांचा सत्कार व बक्षिस तसेच सोलापुरी चादर देऊन नगराध्यक्षा रेणुका गावीत, तहसिलदार प्रमोद वसावे, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेविका मेघा जाधव, प्रा.ज्योती जयस्वाल, आरोग्य निरीक्षक भरत पाटील यांचाहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी यांची होती उपस्थिती
अलायन्स क्लबचे जयंत शहा, धनसुख शहा, भुपेंद्र चहावाला, अशोक मेवावाला, रागीनी शहा, हनसा शहा, नगराध्यक्षा रेणुका गावीत, तहसिलदार प्रमोद वसावे, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेविका मेघा जाधव, प्रा.ज्योती जयस्वाल, आरोग्य निरीक्षक भरत पाटील, जितेंद्र शिंदे, शैलेद्र वसावे, अजय तांबोळी आदी उपस्थित होते.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी तहसिदार प्रमोद वसावे म्हणाले की ही संस्था फार चांगले काम करीत आहे. सफाई कामगारांनी फक्त एकदिवस संप जरी केला तर सर्व शहरात घाणीचे साम्राज निर्माण होते सफाई कामगारांचा सन्मान केला गेला. त्याचा आनंद होत आहे मी या संस्थेचा आभार मानतो. खरोखर आपल्या सर्वाचे आरोग्य चांगले ठेवण्या मागे यांचा मोठा वाटा असतो यावेळी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नवापुर नगरपालिकेचे 100 सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र शिंदे, शैलेद्र वसावे, अजय तांबोळी यांनी परीश्रम घेतले.