नवापुरात शिवसेनेचा शिवसंर्पक अभियान कार्यक्रम

0

नवापूर । नवापुरात शिवसेनेच्या शिवसंर्पक अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धुळे व नंदुरबार जिल्हासंपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, दिपक गवते, हंसमुख पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख रिना पाडवी, जिल्हा युवासेनेचे प्रमुख अर्जुन मराठे, ज्योती चौधरी, अरुणा पाटील, उज्वला सोनार, मोगिताई गावीत, गणेश वडनेरे, गोविद मोरे, अनिल वारुडे, प्रविन ब्रम्हे, दर्पण पाटील, देवका पाडवी, इब्राहिम शेख, भटु पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी सांगितले की, शिवसेना ही वाघांची संघटना आहे. सामान्य माणसांसाठी काम करणे ही शिवसेनेची कार्यपद्धती आहे. या भागात लोकांचे मोठे कार्य करुन फक्त शिवसेनेचा आवाज चालला पाहीजे असे काम करा असे आवाहन केले. जिल्हाप्रमुख पाडवी म्हणाले की सामान्य माणसांसोबतचा अन्याय आता सहन केला जाणार नाही. कार्यक्रमाची प्रास्तावना गणेश वडनेरे यांनी केली. संचालन प्रविन ब्रम्हे यांनी केले तर आभार अनिल वारुळे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक वसाहत (एम आय डी सी.)येथे भारतीय कामगार सेना महासंघ या फलकाचे अनावरण व भारतीय कामगार सेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचा हस्ते करण्यात आले.