नववर्षात सरकारी नोकरदारांना मिळणार सुट्यांचा चांगला योग

0

 

जळगाव (सागर दुबे) : 2016 मध्ये बर्‍याच सार्वजनिक सुट्या ह्या रविवारीच आल्यामुळे सरकारी नोकरदारांना या सुट्यांचा मनसोक्त आनंद लुटता आला नाही. परंतू नववर्ष 2017 मध्ये रविवार सोडून सर्व सार्वजनिक सुट्या आल्यामुळे सरकारी नोकरदारांना 2017 मध्ये चांगलीच मजा आहे. यातच 2017 मध्ये एकूण 53 रविवार, एकाही रविवारी सार्वजनिक सुट्टी नाही. त्यामुळे त्यांना सुट्यांची पर्वणीच मिळाली आहे. एकूणच यावर्षीच्या तुलनेत 2017 मध्ये सुट्यांचा चांगला योग जळुन आला आहे. दोन सार्वजनिक सुट्या 26 जोनवारी प्रजासत्ताक दिन गुरूवारी असून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा मंगळवारी आला तर इतर 20 शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहेत.

अनेक सण शुक्रवारी किंवा सोमवारी
नववर्षात 53 रविवार आले आहेत. त्यात एकही सार्वजनिक सुटी ही रविवारी आली नसल्यामुळे रविवारच्या 53 सुट्यांसह अन्य सुट्या या नव्या वर्षात मिळणार आहेत. अर्थात दोन सार्वजनिक आणि 20 शासकीय सुट्या नववर्षात मिळणार आहे. त्यातच अनेक सण हे शुक्रवारी किंवा सोमवारी आल्यामुळे बरेचदा दुसरा किंवा चौथा शनिवार व रविवार अशा सलग तीन सुट्यांचा आनंद नववर्षात सरकारी नोकरदारांना उपभोगता येणार आहे. 2016 मध्ये सरकारी नोकरदारांच्या शासकीय सुट्या ह्या बर्‍याचदा रविवारी आल्या असल्यामुळे त्यांना त्या सुट्यांचा लाभ घेता आला नव्हता.

24 फेंब्रुवारीला महाशिवरात्री
दोन सार्वजनिक सुट्या 26 जोनवारी प्रजासत्ताक दिन गुरूवारी असून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा मंगळवारी आला आहे. या शिवाय शासकीय सुट्या जसे 24 फेंबु्रवारीला शुक्रवारी महाशिवरात्री आहे. त्यानंतर 13 मार्च राजी धुलीवंदन हे सोमवारी असून होळी ही रविवारी 12 मार्च रोजी आहे. 28 मार्च रोजी मंगळवारी गुढीपाडवा असून 4 एप्रिल रोजी मंगळवारीच श्रीराम नवमी आहे. एप्रिल महिन्यात 14 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुड फ्रायडे शुक्रवारी एकाच दिवशी आल्यामुळे तशी एक सुटी जरी कमी झाली असली तरी इतर सुट्या रविवारी सोडून आल्यामुळे याचे फारसे काही फरक पडणार नाही.

सुट्यांची चांगळ
1 मे रोजी महाराष्ट्र दिन सोमवारी, 10 मे रोजी बुध्द पौर्णिमा बुधवारी, 26 जुन रोजी रमजान ईद सोमवारी, 15 ऑगस्ट रोजी गोपाळकाला मंगळवारी, 17 ऑगस्ट रोजी पतेती गुरूवारी, 25 ऑगस्टे रोजी गणेश चतुर्थी शुक्रवारी, 2 सप्टेंबरला बकरी ईद शनिवारी, 30 सप्टेंबर रोजी दसरा शनिवारी, 3 ऑक्टोंबर गांधी जयंती सोमवारी अशा सलग सुट्या आल्या आहेत. यानंतर दिवाळीच्या सुट्या आहेत. 4 नोव्हेंबर रोजी शनिवारी गुरूनानक जयंती, 1 डिसेंबर रोजी शुक्रवारी ईद-ए-मिलाद, 25 डिसेंबर रोजी सोमवारी ख्रिसमस अशी सुट्यांची चांगळ राहणार आहे. एकूणच यावर्षीच्या तुलनेत 2017 मध्ये सुट्यांचा चांगला योग जळुन आला आहे.