नवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…

0

जळगाव: नवर्‍याला सोडून दे , मला तुझ्यासोबल लग्न करायचे आहे. नाही तर मी मरुन जाईल अशी धमकी देत 22 वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्‍या आकाश दिनेश जाधव (वय 21 रा. राजमालती नगर ) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील राजमालती नगरातील आकाश दिनेश जाधव हा एकेदिवशी त्या विवाहितेचा पती घरी नसतांना आकाश हा तिच्या घरी गेला, व मी मरुन जाईल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. अशाप्रकारे आकाश हा विवाहितेला वारंवार धमकी देत होता. यानंतरच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील मांजरी, याठिकाणी घेवून जात विवाहितेवर अत्याचार केला. मांजरीहून परतल्यावर विवाहितेने हा प्रकार तिच्या आईला कळवून हकीकत कथन केली. दरम्यान शहर पोलिसात ती विवाहिता हरविल्याची तक्रार दाखल असल्याने मंगळवारी ति विवाहिला शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. याठिकाणी तिने दिलेल्या तक्रारीवरुन आकाश दिनेश जाधव याच्याविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy