नवरदेवाला बलात्काराच्या आरोपात लग्नातच अटक

0

पालघर । लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी आतुर झालेल्या नवरदेवावर चक्क पोलिसांच्या बेड्यांमध्ये अडकण्याची वेळ आली आहे. पालघरमध्ये लग्नाच्या दिवशीच नवरदेवाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पालघरचा तरुण 24 वर्षांच्या तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये होता.

पीडित तरुणी त्याची नातेवाईक आहे. लग्नाचे वचन देऊन तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. एकमेकांना बालपणापासून ओळखतो, रक्ताच्या नात्यातील भावंडांचीही आपल्या कुटुंबात लग्न होत असल्यामुळे आपण तरुणाच्या वचनांना बळी पडलो आणि शारीरिक संबंध ठेवले, अशी कबुली पीडितेने दिली आहे. सहा वर्षांपासून दोघे रिलेशनशीपमध्ये होते. पोलिसांनी लग्न मंडपातूनच तरुणाला अटक केली.