नरेंद्र मोदींच्या आधी सोनिया गांधींनी साधला देशवासियांशी संवाद

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधण्याआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडीओ शेअर करुन देशवासियांना संबोधित केले. यावेळी सोनिया गांधींनी करोनाविरोधातील लढाईत दिवसरात्र मेहनत करणार्‍या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचे कौतुक केले आहे.

आपण सर्वजण एकत्र मिळून करोनाची लढाई लढणे यापेक्षा मोठी देशभक्ती काय असू शकते. सुरक्षा उपकरणांची कमतरता असतानाही आपले योद्धा करानाविरोधातील युद्ध लढत आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी स्वसंरक्षण ड्रेस नसतानाही रुग्णांवर उपचार करत आहेत, असेे सोनिया गांधींनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी लोकांना लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

लॉकडाउन यशस्वी व्हावा यासाठी पोलीस आणि जवान कर्तव्य निभावत आहेत. स्वच्छता कामगार अनेक सुविधा नसतानाही विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी मदत करत आहेत. सरकारी कर्मचारीदेखील महत्त्वाच्या सेवा सुरु राहाव्यात यासाठी मेहनत करत आहेत. पण जर आपण त्यांना पाठिंबा दिला नाही तर ते त्यांचे काम योग्य रितीने करु शकणार नाहीत. डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, हे चुकीचे आहे. ही आपली संस्कृती नाही. या लढाईत आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Copy