नदाल सॅम क्युरीकडून पराभूत

0

अ‍ॅकापुल्को । ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर, मेक्सिको खुल्या टेनिस स्पर्धेतही स्पेनच्या राफेल नदालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या सॅम क्युरीने अंतिम लढतीत दर्जेदार सव्र्हिस लगावत नदालवर 6-3, 7-6(3) असा विजय मिळवला. क्युरीने 19 बिनतोड सव्र्हिस करत कारकीर्दीतील नवव्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मेक्सिको स्पर्धा जिंकणारा तो पहिला अमेरिकन खेळाडू आहे.

क्युरीने धक्कादायक निकाल नोंदविले
या स्पर्धेत क्युरीने एकामागून एक धक्कादायक निकाल नोंदवताना जेतेपदाकडे कूच केली होती. क्युरीने पाचव्या मानांकित डेव्हिड गॉफीन, चौथ्या मानांकित डॉमिनिक थिएम, सहाव्या मानांकित निक कुर्यिगोस आणि दुसर्‍या मानांकित नदालला पराभवाची चवचाखवली. 2016मध्ये डेलरे बिच जेतेपदानंतरचे क्युरीचे हे पहिलेच जेतेपद आहे. नदालले 2005 व 2013मध्ये येथे जेतेपद पटकावले होते. महिला गटात युक्रेनच्या लेसीया त्सुरेंकोने कारकीर्दीतील तिसरे जेतेपद पटकावातना दुसर्‍या मानांकित फ्रान्सच्या क्रिस्टिना मॅलडेनोव्हीकचा 6-1, 7-5 असा पराभव केला.