नगराध्यक्षांकडे हिंमत नाही तर इज्जतही आहे: माजी आमदार रघुवंशी

0

नंदुरबार: नगरपरिषदेची ऑनलाइन सभा सुरु असताना भाजपाच्या एकही नगरसेवकाने सहा महिन्याची घरपट्टी माफ करण्याची मागणी केली नाही. असे असताना सभेत जे घडले नाही, त्याची बॅनरबाजी करून विरोधकांनी जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे, नागराध्यक्षांची हिंमत नाही पण इज्जत आहे, असा टोला शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे.

नगरपरिषदेची ऑनलाइन सभा नुकतीच झाली आहे. त्यात सहा महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा ठराव झाल्याचे बॅनर भाजपाच्या विरोधी गटाने ठीक ठिकाणी लावले आहेत. डॉ.रवींद्र चौधरी यांनी देखील एक पत्रक काढून हिम्मत असेल तर सभेचे चित्रीकरण दाखवण्याचे आव्हान नगराध्यक्षांना केले होते. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या परिवारातील भूखंडावर देखील गंभीर आरोप चौधरी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले. एवढेच नव्हे तर डॉ.रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या आव्हानानुसार नगरपालिका ऑनलाइन सभेचा व्हिडिओ देखील पत्रकारांना दाखविला.

Copy