Private Advt

नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

भुसावळ : भुसावळच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या नगरसेवक तथा अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सुनील नेवे यांच्यावर वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील नाभिक बांधवांसह रेल्वे स्थानकावरील कुली बांधवांना महिनाभर पुरेल इतक्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रसंगी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

या मान्यवरांची उपस्थिती
प्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, वसंत पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, देवा वाणी, अमोल इंगळे, अनिकेत पाटील, मुकेश पाटील, किशोर पाटील, प्रशांत नरवाडे, प्रमोद पाटील, दिनेश नेमाडे, सुमीत बर्‍हाटे, संदेश सुरवाडे यांच्यासह नेवे परीवारातील सदस्य उपस्थित होते.