नगरविकास दिनानिमित्त पालिकेतर्फे कार्यक्रम

0

एरंडोल । शासनाच्या नगरपरिषद विभागाच्या आदेशावरून नगर विकास दिनानिमित्त नगर पालिकेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने शहरात स्वच्छतेबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. नगरविकास दिनानिमित्त पालिकेतर्फे शहरातील नागरिकांना घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक पदार्थ याची कशा प्रकारे विल्हेवाट लावावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पं.दीनदयाळ अंत्योदय योजना राज्य नागरी उपजीविका अभियान यीजानेची माहिती फलकाद्वारे व्यापक स्वरूपात देऊन पात्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

पालिकेतील कर्मचार्‍यांसाठी कामकाज विषयक प्रशिक्षण घेण्यात आले.शहरातील प्रमुख परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी विविध भागात पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम, मुख्याधिकारी विशाखा मोटघरे, नगरसेवक, आरोग्य निरीक्षक सुनील महाजन, करनिरीक्षक व्ही.टी.साळी, आनंद दाभाडे, बांधकाम अभियंता पंकज पन्हाळे, पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांनी कचरा जमा करणार्‍या महिलांना देखील मार्गदर्शक सुचना केल्या.