नगरदेवळयात २६/११च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

0

नगरदेवळा – येथील जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे २६/११च्या हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी सभेचे आयोजन आयोजन एस.के.पवार शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ करण्यात आले होते. आपल्या शहीद बांधवांना श्रद्धांजली देण्यासाठी नगरदेवळा ग्रामस्थ सायंकाळी ६ वाजता उपस्थित होते. यावेळी नगरदेवळा औट पोस्टचे सर्व पोलिस बांधव उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी मेणबत्ती लावून तसेच दोन मिनिटे स्तब्ध उभे रहात श्रद्धांजली अर्पण केली.

Copy