Private Advt

नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला; २ जवान शहीद

0

बस भूसुरूंग स्फोटाने उडविली, 5 जवान जखमी

विजापूर : छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सोमवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांची बस भूसुरूंग स्फोट घडवून उडवली. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. तर अनेक जवान जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगड दौर्‍यापूर्वी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणले आहेत.

विजापूरच्या मुख्य मार्गाचे मोठे नुकसान
विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी साखळी भूसुरूंग स्फोट घडवून आणले. या स्फोटांनी विजापूरच्या मुख्य मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. नक्षलवाद्यांनी जवानांची बसही स्फोटाने उडवून दिली. यात दोन जवान शहीद झाले. तर पाच जवान जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2005 पासून आतापर्यंत छत्तीसगडमधील बस्तर परिसरात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलांचे जवळपास 47 जवान शहीद झाले आहेत. सप्टेंबर 2005 मध्ये विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या बसला लक्ष्य केले होते. त्यात 22 जवान शहीद झाले होते. नक्षलवाद्यांनी या बस उडवून देण्यासाठी तब्बल 200 किलो स्फोटकांचा वापर केला होता.