नंदूरबार शहरात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

0

नंदुरबार – दरवर्षी क्रीडा विभागाकडून युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हास्तरावर करण्यात येते. त्यानुसार सन 2018-19 याही वर्षी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन शहरातील श्रीमती डी.आर.हायस्कूल, येथे 29 नोव्हेंबर, 2018 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सदर युवा महोत्सवामध्ये पुढीलप्रमाणे कला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीय यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

याप्रमाणे कलाचे सादरीकरण होणार
लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका-इंग्रजी व हिंदी, शास्त्रीय गायन-हिंदुस्थानी, शास्त्रीय नृत्य, सितार, बासरी, तबला, वीणा, मृदंग, हार्मानियम-लाईट, गिटार, मणिपूरी नृत्य, भरतनाट्यम कथ्थक, कुचिपुडी नृत्य, वक्तृत्व असे 18 कलाप्रकारचे आयोजन करण्यात येणार आहे. या युवा महोत्सवामध्ये सहभागी होणेकरीता वयाबाबतचा दाखला, रहिवासी दाखला इ. कागद पत्रांसह प्रवेशिका 27 नोव्हेंबर, 2018 रोजीपर्यंत सायं. 5.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे व श्रीमती डी.आर. हायस्कुल, नंदुरबार येथील श्री. श्रीराम मोडक क्रीडा शिक्षक यांचेकडे सादर करावी. या जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये प्राविण्य प्राप्त कलाकारांना संपन्न होणाऱ्या विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यामुळे कला प्रकारानुसार सदर जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त कलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी संजय सबनीस यांनी केले आहे.

Copy