नंदुरबार शहरात विवाहितेचा गळा चिरून खून

नंदुरबार : शहरातील तुळशी विहार कॉलनीत पतीने पत्नीचा कौटुंबिक कारणातून चाकून गळा चिरून खून केला. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली. रेखा नामदास असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर पती अरुण सुखलाल नामदास याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कौटुंबिक वादातून पत्नीलाच संपवले
नंदुरबार शहरातील तुळशी विहार कॉलनीतील प्लॉट क्रमांक 22 च्या वरच्या मजल्यावर राहणार्‍या अरुण सुकलाल नामदास व त्यांची पत्नी रेखा अरुण नामदास यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाले. त्याचा राग आल्याने अरुण नामदास याने त्याची पत्नी रेखा नामदास हिचा चाकूने गळा कापून खून केला. या प्रकरणी अशोक देवराम खांडेकर यणांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्यात अरुण सुकलाल नामदास याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे हे करीत आहेत.