नंदुरबार येथे संघर्ष यात्रेनिमित्त होणार सभा

0

नंदुरबार । कर्जमुक्तीच्या जागरणासाठी निघालेल्या संघर्ष यात्रेचे 16 एप्रिल रोजी नंदुरबार येथे आगमन होत आहे. याच दिवशी दिनदयाल चौकात जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरकारचा करणार निषेध
विधी मंडळात आवाज उठवूनही कर्जबाजारी शेतकर्‍यांना शासनाने दिलासा दिला नाही. या भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी आणि शेतकर्‍यांना जागृत करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली आहे. ही यात्रा दि. 16 एप्रिल रोजी शहादा व नंदुरबार येथे येणार आहे.

जाहीर सभेत शेतकर्‍यांची राहणार उपस्थिती
फदिनदयाल चौकात दुपारी 3 वा. जाहीर सभा होणार असून या सभेला काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्यासह मित्र पक्षातील नेते मार्गदर्शन करतील. या सभेनंतर संघर्षयात्रा आष्टे मार्गे धुळे येथे जाण्यासाठी रवाना होणार आहे. या संघर्ष यात्रेच्या स्वागतासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ.रघुवंशी यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित उपस्थित होते.