नंदुरबार येथील कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू !

0

नंदुरबार: शहरातील बागवान गल्लीतील 70 वर्षाच्या कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित मृतांची संख्या 5 झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याची बाब समोर आल्यानंतर प्रशासनाने 4 दिवस नंदुरबार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वीच शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे एका कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा शहरातील बागवान गल्लीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे.