Private Advt

नंदुरबार पाठोपाठ आष्टे वीज कार्यालय ही केलं सील

नंदुरबार –  शहरातील वीज वितरण कंपनी कार्यालय पाठोपाठ तालुक्यातील आष्टे येथील वीज उपकेंद्राला देखील महसूल अधिकाऱ्यांनी सील केल्याची कारवाई केल्याने सर्व सामान्यांची बत्ती गुल करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच शॉक दिला आहे.

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांवर महसूल विभागाची अकृषिक कराची लाखो रुपयांची थकबाकी आहे. ती भरण्यासाठी तहसीलदार थोरात यांनी नोटीस देखील बजावली आहे,मात्र वीज कंपनीने थकबाकी भरली नाही. उलट वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन वीज पुरवठा बंद करून डीवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी देखील नंदुरबार शहर पाठोपाठ तालुक्यातील आष्टे येथील उपकेंद्र सील केले आहे, आणखी बरीचशी कार्यालय सील केले जाणार असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. महसूल विभागाच्या या वक्रदृष्टी मुळे वीज अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.