नंदुरबार जि.प.निवडणुकीत वाद; अक्कलकुव्यात शिवसेना जिल्हा प्रमुखांचे कार्यालय पेटविले

0

नंदुरबार: काल बुधवारी झालेय जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या वादातून नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयाला आग लावण्यात आल्याची घटना रात्री उशिरा घडली. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरु असून याप्रकारामुळे राजकीय तणाव निर्माण झाले आहे. आदिवासी बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ अक्कलकुवा बंदची मागणी केली आहे. आज गुरुवारी पोलिसांनी याठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला असून तणावपूर्ण शांतता सध्या आहे.

बुधवारी रात्री शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांच्या कार्यालयास आग लावण्यात आली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आग लावल्याचे आरोप होत आहे. भाजप जि.प.सदस्य कपिल चौधरी व उपजिल्हाप्रमुख विश्वास मराठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

Copy