Private Advt

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या मतदान क्षेत्रात सुट्टी जाहीर

जनशक्ती नंदूरबार | निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त जागेसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. 

मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी शहादा, नंदुरबार व नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतदान क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले आहे.