नंदुरबारमध्ये कोरोना कहर: आज 38 रुग्ण

0

नंदुरबार। जिल्ह्यात कोरोनाचा व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज गुरुवारी एकाच दिवशी चक्क 38 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली असून बिनधास्तपणे मुक्त संचार करणाऱ्या नागरिकांनी आता तरी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, आज आढळुन आलेल्यांमध्ये तळोदा येथील 2, शहादा येथील 2, आणि नंदुरबार मध्ये 29 रुग्ण व जिल्हा रुग्णालयातील 5 जणांचा समावेश आहे.

Copy