नंदुरबार जिल्ह्यात एसटीचे तब्बल 80 कर्मचारी निलंबित

नंदुरबार – जिल्हातील तब्बत ८० एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. याच बरोबर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 250 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

एसटी गेल्या  21 दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपात आता निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. राज्य शासनाचे परिवहन महामंडळात विलीनीकरण करावे या मागणीसाठी 21 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. महामंडळाकडून निलंबनाची कारवाई वाहक-चालक आणि वाहतूक नियंत्रकावर करण्यात येत आहे. त्यानुसार धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्याकडून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 250 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

 
यात जिल्ह्यातील सर्व आगारातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून नंदुरबार, शहादा ,तळोदा  आणि नवापूर प्रत्येकी वीस कर्मचाऱ्यांप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील 80 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार नोटिसा बजावण्यात येत आहेत. यावर लवकरच तोडगा निघावा अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.