नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकासित करण्याची मागणी

0

तळोदा । राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नुकताच जिल्ह्यात आवश्यक त्या धार्मिक स्थळांना निधी उपलब्ध करून एक सुखद धक्का दिला असला तरी सातपुड्यातील निसर्ग संपन्न अश्या काही ठिकाणी देखील निधी मिळणे अपेक्षित होते. जेणे करून वन पर्यटनच्या दृष्टीने या भागाचा विकास होऊन स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल. सातपुड्यातील निसर्ग सौदर्य तरुनाईला वेड लावणार असून तळोदा अक्कलकुवा धडगांव तालुक्यातील अनेक दुर्गम स्थळ आहेत. जिल्ह्यात एक दिवसाचा विरंगुळा चे ठिकाण तोरणमाळ सोडल्यास दिसून येत नाही. त्यामुळं पावसाळ्यात सातपुड्याच्या पर्वतराजीत कोसळणार्‍या पावसामुळं ठीक ठिकणी छोटे मोठे धबधबाचा ठिकाणी उत्साही तरुण दरवर्षी जात असतात. मात्र या ठिकाणी पर्यटन स्थळ घोषित झालेलं नाही या पैकी वाल्हेरी हे ठिकाण विकसित होण्याकरिता निधी मंजूर असून अजून कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सातपुड्यातील या सारख्या अनेक दुर्गम स्थळी रस्ते, वीज, व कोणतेही सुरक्षेचा दृष्टीकोनातून कोणतेही सूचना फलक नाही. त्यामुळे नेमका धबधबा कुठे, किती खोल आहे याचा अंदाज येत नाही. पावसाळ्यात तरी इथे मानधनावर स्थनिक माहितगार सुरक्षा रक्षक ठेवावा अशी मागणी होत आहे. मात्र या सर्व स्थळना जर पर्यटन विभागाकडून जर निधी उपलब्ध झाला तर निश्चितच हे ठिकाणे अल्पावधीत प्रसिद्धीस येतील.

अशी आहेत पावसाळ्यातील प्रेक्षणीय व धोकेदायक स्थळे
तळोदा तालुक्यातील वाल्हेरी हे स्थळ 17 कि,मी,अंतरावर असून या ठिकाणी दोन धबधबे आहेत. या ठिकाणी जिल्ह्यातून व गुजरात राज्यातून तरुण पर्यटक येत असतात. समाधान कारक पाऊस झाल्यास हे पाणी आक्टोंबरचा मध्यपावेतो टिकून असते. या ठिकाणी देखील अनेकांचे जीव गेले आहेत. मागील वर्षी तळोदा शहरातील दोन तरुण व्यापारी आपल्या इतर मित्रांसोबत वनभोजनासाठी गेले होत मात्र या ठिकाणी त्यांचा बुडल्याने दुर्देवी अंत झाला होता. या अगोदर देखील 4ते 5 तरुणाचा जीव या ठिकाणी गेला आह

धडगांव तालुक्यातील बिलगाव येथील बारा मुखी धबधबा
धडगांव तालुक्यातील बिलगावं हे गाव दुर्गम भागात असून धडगांव पासून जवळच आहे या ठिकाणी देखील दरवर्षी तळोदा शहादा तालुक्यातील तरुण पावसाळी पर्यटन म्हणून जात असतात यंदा देखील असेच तळोद्यातील सात तरुण फिरण्यासाठी आले असता दोन स्कखे भाऊ चा यात दुर्देवी अंत झाला. अश्या घटनांची पुनावृत्ती टाळ्यायची असल्यास आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत पालकमंत्री या नात्याने पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी लक्ष घालून सातपुड्यातील निसर्गस्थळांना निधी मिळवून विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.