नंदुरबारात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला

0

नंदुरबार : नंदुरबार शहरातील 48 वर्षीय एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून अली साहेब मोहल्ला भागाच्या एक किलोमीटर परीसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून त्याच्या 1 ते 2 किलोमीटर परीसरात कोणत्याही वाहनास अनुमती नसेल तसेच कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. नंदुरबार शहरातदेखील संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे. नागरीकांनी घाबरून न जाता घरातच राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे. रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वॉरंटाईन केले असून संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.

Copy