नंदुरबारात एसटीच्या ५३ संपकरी कर्मचाऱ्यांकडून रक्तदान

नंदुरबार – राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच आहे. बुधवारी नंदुरबार आगारातील एसटीच्या ५३ संपकरी कर्मचाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यात आले. जनकल्याण रक्त संकलन केंद्राच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अवकाळी पावसाच्या तुरळक सरी सुरू असतानाही कुठलाही मंडप नसताना रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.

एसटीच्या कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरूच आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने आणि आत्तापर्यंत ४३ एसटी कामगारांनी जीवनयात्रा संपवून बलिदान केले. तयांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक ललित सूर्यवंशी, रवींद्र पाटील यांनी दिली. एसटि कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद म्हणून नियमित प्रवास करणारे प्रवासी गणेश पाचोरे, गौरव बागुल, गणेश चित्ते, विषाल इंद्रेकर, निमेश चौधरी यांनीही रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक आकाश जैन, खलील काजी, मनीष पवार, गोरख भिल यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी ललित सूर्यवंशी, रवींद्र पाटील ,वाय. के. पाटील, महेंद्र आगळे,राकेश बेडसे यांच्यासह सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.