नंदुरबारातील लाचखोर महिला वनरक्षकासह दोघांना पोलिस कोठडी

0

वाहन सोडवण्यासाठी केली होती 35 हजार रुपयांची मागणी

नंदुरबार- पीकअप वाहनात जळावू लाकडासह कोळसा व भाजीपाला असतानाही वाहन सोडवण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या महिला वनरक्षक पिंकी भिमराव बडगुजर (33, वन परीक्षेत्र कार्यालय नंदुरबार) व खाजगी पंटर जागो मंगा धनगर (रा. खोकराळे, ता.जिल्हा नंदुरबार) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने शुक्रवारी अटक केली होती. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपींनी सुुरुवातीला 35 हजारांची मागणी केली होती मात्र तडजोडीत ही रक्कम दहा हजार देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. नंदुरबार एसीबच्चे पोलिस उपअधीक्षक शिरीष टी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

Copy