नंदुरबारला पुन्हा 6 जण कोरोना पॉझिटिव्ह: एकाचा मृत्यू

0

नंदुरबार: जिल्ह्यात आज पुन्हा 6 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे, नंदुरबार ला कोरोना पॉझिटिव्ह लचे एक दिवसाआड रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. आज सोमवारी शहरातील योगेश्वर कॉलनीत 35 वर्षीय पुरुष , राजीव गांधी नगरमध्ये 29 वर्षीय पुरुष, बागवान गल्लीत 70 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
तळोदा शहरातील मोठा माळीवाडा भगत 40 वर्षीय पुरुष
मोलगी येथे कोरोनाने शिरकाव केला असून 18 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शहादा-लोणखेडा येथील 67 वर्षीय रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला आहे, आता नंदुरबार जिल्ह्यात एकूण 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली असून त्यातील 32 जण बरे झाले आहेत, 4 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 30 जणांवर उपचार सुरू आहे. धुळे येथे उपचार सुरू असलेल्या रुग्णाची संख्या 2 आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Copy