नंदुरबारला नरबळीचा प्रकार उघडकीस?

0

नंदुरबार। गुप्तधन मिळविण्यासाठी अधोरी पूजा करणाऱ्या भोंदूबाबासह एकाला नंदुरबार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अर्धनग्न अवस्थेत चार मुलांकडून ही पूजा शहरातील बाबा गणपतीच्या मागे असलेल्या एका घरात ही पूजा केली जात होती. यावेळी त्यातील एका मुलाने बाहेर येऊन हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

अमोल सोनार याने आपल्या नातेवाईक असलेल्या व्यक्तींच्या साहाय्याने गुप्तधन मिळविण्यासाठी हा अघोरी प्रयोग भोंदूबाबाच्या मंत्रोपचाराने सुरू केला होता, चार मुलांना घेऊन ही पूजा केली जात असल्याने नेमका हा प्रकार नरबळीचा तर नव्हे ना असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबासह अमोल सोनार यास अटक केली आहे. या प्रकरणाने नंदुरबार शहरात खळबळ उडाली आहे.

Copy