नंदुरबारला आणखी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह

0

नंदुरबार:शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार होत आहे. बरे झालेले रुग्ण घरी पोहचत नाही, तोच पुन्हा नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शहरात कोरोनाचे आणखी तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात राजीव गांधीनगर येथील 35 वर्षाचा पुरुष आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात 30 व 28 वर्षाची महिला कर्मचार्‍यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राजीव गांधीनगर येथे बॅरिकेडिंग आणि फवारणी करण्यात आली आहे. रुग्णाच्या संपर्कातील 4 व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 44 झाली आहे. यातील 30 रुग्ण संसर्गमुक्त झालेले असून तिघांचा मृत्यू झालेला आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या 11 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Copy