नंदुरबारमध्ये पुन्हा दहा जण कोरोना पॉझिटिव्ह

0

नंदुरबार: जिल्ह्यात पुन्हा 10 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, त्यात तळोदा येथील मोठा माळीवाडा काका शेठ गल्ली 1, शिवराम नगर 1, असे 7, रुग्ण आहेत तर नंदुरबार शहरातील मणियार मोहल्ला 1 व सिंधी कॉलनी 1, अशा 2 जणांचा समावेश आहे,आणि शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण सापडला नव्हता, त्यामुळे दिलासा मिळत असतांनाच आज दि, 18 जून रोजी 10 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 78 इतकी झाली आहे. 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 33 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत, सध्या स्थितीत 38 रुग्ण उपचार घेत आहेत,कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात 4 दिवसांचा बंद ठेवण्यात आला आहे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बंद घोषित करण्यात आला असला तरी तिसऱ्या दिवशी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंतेत भर पडू लागली आहे.

Copy