Private Advt

नंदुरबारजवळ अपघात : आरपीएफ जवानासह दोघे ठार

नंदुरबार शहराजवळील भोणे फाट्याजवळ अपघात : शहर पोलिसात अपघाताचा गुन्हा

नंदुरबार : रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभा असलेला डंपर न दिसल्याने भरधाव अ‍ॅपे रीक्षा डंपरवर आदळून झालेल्या अपघातात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानासह दोघे जागीच ठार झाला. हा अपघात नंदुरबार शहरातील भोणे फाट्याजवळ बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडला. या अपघात प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरपीएफ जवान चरणसिंग गावीत (49, रा.मंजुळा विहार, दुधाळे शिवार नंदुरबार) व प्रवीण अंबालाल परदेशी (38) अशी मयतांची नावे आहेत.

डंपर न दिसल्याने आदळली अ‍ॅपे रीक्षा
सूत्रांच्या माहितीनुसार, शहराजवळील भोणे फाट्याजवळ हॉटेल गौरव पॅलेसजवळ डंपर (क्र.एम.एच.18-8351) हा उभा करण्यात आला होता मात्र चालकाने कुठलेही इंडिकेटर अथवा पार्किंग लाईट न लावल्याने पाठीमागून आलेल्या भरधाव अ‍ॅपे रीक्षा (क्र.एम.एच.41 सी.5498) ही डंपरवर आदळली. या अपघातात आरपीएफ जवान चरणसिंग गावीत (49, रा.मंजुळा विहार, दुधाळे शिवार, नंदुरबार) व प्रवीण अंबालाल परदेशी (38) हे गंभीर जखमी झाले. अत्यवस्थ अवस्थेत दोघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी दोघांना मृत घोषित केले. या अपघातात अ‍ॅपे रीक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघात प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.