नंदुरबामधील ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण

0

नंदुरबार:जिल्ह्यात कोरोनाचा वेग वाढायला सुरुवात झाली आहे, आणखी नवीन 6 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व जण आधीच कोरोना बाधित असलेल्या त्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.  या सहा जणांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संबंधित अधिकारी कुटुंबासह बांधकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानी राहत होते. नवीन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये त्या अधिकाऱ्याची 68 वर्षीय आई,43 वर्षीय पत्नी,20 वर्षाचा मुलगा,15 वर्षाची मुलगी यांच्यासह त्यांच्या संपर्कातील 31 वर्षीय महिला, आणि 12 वर्षीय मुलगी या 6 जणांचा समावेश आहे. ते राहत असलेला परिसर सील करण्यात आला असून त्या ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे. याच परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने हा परिसर

प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. एकाच दिवशी किरोनाचे 6 रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 50 झाली आहे. त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत 17 कोरोना बाधितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Copy