नंदीग्राममध्ये अटीतटीच्या लढतीत दीदींचा पराभव

कोलकाता: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे. भाजपाची शंभरी पूर्ण करतानाही दमछाक झाली आहे. दरम्यान ममता बॅनर्जीचच नंदीग्राममध्ये धक्कादायक पराभव झाला आहे.  भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा १६२२ मतांनी पराभव केला आहे.