Private Advt

धूम स्टाईल मोबाईल लांबवला : तिघे चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

भुसावळ : शहरालगतच्या कंडारी येथील पीओएच कॉलनीत जेवण झाल्यानंतर शतपावली करीत असलेल्या विलास विश्वनाथ सोनार यांच्या हातातून आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी धूम स्टाईल लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल दोन वर्षानंतर या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिघा आरोपींच्या आवळल्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याप्रकरणी निकेश मधुकर वानखेडे (23, रा.कंडारी, भुसावळ), सचिन मनोज जाधव, (19, रा.पाळधी, ता.जामनेर) यांना अटक केली तर संशयीतांनी हा मोबाईल सिध्दांत अरुण म्हस्के (25 रा.पीओएच कॉलनी, आरबी-आय-1962, कंडारी, भुसावळ) यास अटक करीत आरोपींना भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय अशोक महाजन, हवालदार सुनील दामोदरे, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, चालक कॉन्स्टेबल मुरलीधर बारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.