धुळ्यात रस्ते मार्गे येणारा सव्वा लाखांचा गांजा धुळे गुन्हे शाखेकडून जप्त : एकाला अटक

Dhule Crime Branch’s big operation : Cannabis worth half a lakh seized धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे चारचाकी वाहनातून सव्वा लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली. आनंद गणेश आरर्डे (बोरडगाव रोड, भोसले आखाडा, मच्छिंद्रनाथ कॉलनी, अहमदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुंबई-आग्रा महामार्गावर नाकाबंदी लावण्यात आली. चारचाकी (एम.एच.16 सी.क्यू.3663) वाहन आल्यानंतर त्यातून 14 किलो 375 ग्रॅम वजनाचा एक लाख 15 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. सोनगीर पोलिसात या प्रकरणी संशयीत आनंद आनर्डे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, संदीप सरग, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, किशोर पाटील, योगेश जगताप, मयुर पाटील, तुषार पारधी आदींच्या पथकाने केली.